शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी यासाठी वैजापूर तहसीलसमोर उपोषण

वैजापूर ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शेतकऱ्यांना सन २०२०-२१ खरीप हंगामातील पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी म्हणून राष्ट्रीय भ्रष्ट्राचारविरोधी जनशक्तीच्यावतीने वैजापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले असून, उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे.

शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरून ही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. खरीप हंगामातील पीकविमा सरसकट मंजूर करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी.मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी  जनशक्तीतर्फे करण्यात आली आहे.गेल्या 15 दिवसांपासून वैजापूर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणात राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे प्रदेश उपाध्यक्ष रियाज पठाण,जिल्हाउपाध्यक्ष प्रवीण खाजेकर,चंद्रकांत निकम,शेख शकील,बाळासाहेब निंबाळकर,शेख मोअज्जम, संभाजी मलीक, परसराम जाधव,सचिन अंबाडे, बब्बू फौजी, अरुण गायकवाड ,शेख सलीम,सनी बनकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.