कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ; वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घटनेचा निषेध

वैजापूर,२३ डिसेंबर /प्रतिनिधी :- कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना व त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्त्यव्याचा वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

वैजापुर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अजय पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक घालून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी समाज कंटकांवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी कर्नाटक सरकावर दबाव आणण्याची मागणी करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, प्रशांत शिंदे, युवानेते वाल्मीक शिरसाठ ,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे, युवक जिल्हाउपाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, युवक विधानसभा कार्याध्यक्ष सागर गायकवाड, सरपंच अनिल धोत्रे, प्रा.अशोक मस्के, माजी पंचायत उपसाभापती बाळू पाटील शेळके , गणेश कदम, गणेश निकम, लखन त्रिभुवन यांची उपस्थित होती