जायकवाडी धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडले

18 दरवाजे 4 तर ९ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले 

औरंगाबाद, ५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मंगळवारी रोजी  गोदावरी नदीत ​80​ हजार ​172​ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू असून मंगळवारी रात्री धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ​68​ हजार ​459​क्युसेक सुरू असल्याची माहिती  ​धरण शाखा अभियंता विजय काकडे​ यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील ३५ ००० हेक्टर ओलिताखालील क्षेत्रफळ असलेल्या शेतीसह औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यातील व परळी येथील वीज निर्मिती केंद्र औद्योगिक वसाहतीला संजीवनी ठरलेल्या. जायकवाडी धरणाची एकूण लांबी ६० किलोमीटरची आणि दहा किलो मीटर रुंदी असून या धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणी साठ्याची शमता आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी मातीचे धरण म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरण सलग तिसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरण्याचा विक्रम केला आहे. 

​अतिरिक्त जलसाठा या जलाशयात येत असल्यामुळे आज मंगळवारी 5ऑक्टोबर रोजी सायंकाळीच  ‘जायकवाडी’ची 18 दरवाजे क्रमांक 10 ते 27 ही 4 फुट उघडून जवळपास 80459 हजार प्रतिसेकंद क्युसेक  पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरु करण्यात आला​ आहे.अन्य 9 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत.  सध्या पैठण येथील जायकवाडी धरणात पाणीसाठा २१​५७​. ​८००​ दलघमी उपलब्ध असून ९९.​३९​ टक्केवारी नोंद झाली.