वैजापूर-औरंगाबाद रस्त्यावरील खंडाळा गावाजवळ एसटी बस व मोटरसायकल अपघातात तीन तरुण जागीच ठार

वैजापूर ,५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर-औरंगाबाद रस्त्यावरील खंडाळा गावाजवळ एसटी बस व सीटी 100 मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन मोटारसायकलस्वार तीन तरुण जागीच ठार झाले.मंगळवारी(ता.५) सायंकाळी पांच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.अपघातात मृत्यू पावलेल्या तिघांपैकी दोन तरुण वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील तर एक शिऊर येथील आहे.

लासलगाव आगाराची औरंगाबादहून नाशिककडे  जाणारी  एसटी बस (क्र. एम.एच.१४ बीटी ४४) व वैजापूरहून  शिऊरकडे जाणाऱ्या बजाज सिटी 100 मोटरसायकल (क्र. एम.एच.२०,एफ.एन.४१७२) ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार तिघे तरुण जागीच ठार झाले.

या अपघातात ठार झालेल्या  तिघांपैकी दोन तरुण वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील तर एक शिऊर येथील आहे अमोल भाऊसाहेब ठुबे (२३ वर्ष,रापोखरी ) व कडूबा ज्ञानेश्वर ठुबे (२२ वर्ष,रा.पोखरी) व  सोमनाथ साहेबराव निकम ( २५ वर्ष रा.शिऊर) अशी त्यांची नांवे आहेत.अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाययक फौजदार  रजाक शेख, व संतोष सोनवणे,योगेश वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. सहाय्यक फौजदार शेख हे पुढील तपास करीत आहेत