वैजापूर नगरपालिकेतर्फे शौचालयांची साफसफाई

वैजापूर ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर नगरपालिकेच्यावतीने शासनाच्या सार्वजनिक शौचालय सफाई जन भागीदारी या उपक्रमांतर्गत  गुरुवारी सकाळी शहरातील भालेराव वस्ती व ईदगाह नगर परिसरातील शौचालयांची साफसफाई करण्यात आली.याउपक्रमात नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी वंशहरातील साई माऊली ग्रुप व योगा ग्रुपने सहभाग नोंदविला.

Displaying IMG-20210930-WA0037.jpg

नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात नगरसेवक सखाहरी बर्डे, स्वप्नील जेजुरकर,दिनेश राजपूत,पारस घाटे,दशरथ बनकर, डॉ.निलेश भाटिया, नगरसेविका मुमताज सौदागर,बबन त्रिभुवन,प्रा.जवाहर कोठारी,शाम उचित, मनोज गायकवाड,सुरेश धुमाळ,बिलाल सौदागर,,मनोज पंजाबी ,नोडल अधिकारी श्री.मोधानी,स्वछता निरीक्षक प्रमोद निकाळे, विष्णू आलूले,अस्लम शेख,रमेश त्रिभुवन, विशाल राजपूत,ज्ञानेश्वर शिरसाठ व कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.