उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला दोन वेळा मतदान अधिकाराविरुद्धच्या याचिका फेटाळल्या

औरंगाबाद ,३ जानेवारी /प्रतिनिधी :- उपसरपंचाच्यानिवडणुकीतपहिल्याफेरीततसेचसमसमानमतेमिळाल्यास निर्णायक असा अतिरिक्त अधिकार सरपंचाला देणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाने ३०सप्टेंबर२०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकालाआव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांनी मंगळवारी फेटाळल्या.

याप्रकरणी राज्य शासन, ग्रामविकासविभागाचे प्रधान सचिव, कक्षा अधिकारी, औरंगाबादचेजिल्हाधिकारी व औरंगाबाद तहसीलदारांना प्रतिवादी करण्यातआलेहोते.या संदर्भात जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोडयांनीॲड. गोविंद इंगोले पाटील यांच्यामार्फत तर औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, लीला रोडे, मुक्तार शेख यांनीॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केल्याहोत्या.याचिकेनुसार नोव्हेंबर२०२२ रोजी नव्या दुरुस्तीनुसार सरपंच जनतेतून थेट निवडला जातो.सरपंचाला उपसरपंचाच्या निवडीत समान मते पडली, तर निर्णायक मताचा अधिकार देण्यात आला आहे.ग्रामविकासमंत्रालयाच्या कक्षा अधिकाऱ्यांनी यासंबंधी ३०सप्टेंबर२०२२ ला पत्र काढले.सरपंचाला सदस्य म्हणून अधिकार मतदानाचा दिलेलाअसून समसमान मते झाली तर पुन्हा एक मत देण्याचा अधिकार दिला आहे.अशाप्रकारे सरपंचाला दोन मत देण्याचा हक्क या परिपत्रकानुसार देण्यात आला आहे.खंडपीठात ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सरपंच हा पदसिद्ध सदस्य आहे.त्याला उपसरपंच निवडीतदोन वेळा मतदान करता येणार नाही. सदस्य म्हणून सरपंचाने दोन वेळा मत दिले तर ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येमध्ये दोनने वाढ होते. चार आणि तीन असे सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये मत विभाजन झाले तर तीन मतं पडलेल्या उमेदवाराला सरपंचाने दोन मते दिली तर संबंधित ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही नऊ होते.त्यामुळे हा कायदा बेकायदेशीर असल्याचे त्यांनी याचिकेत स्पष्ट केले होते. मात्र, २०१८ मध्ये थेट निवडून आलेल्या सरपंचाला उपसरपंचाच्यानिवडीमध्ये अधिकार नसल्याप्रकरणी खंडपीठात याचिका (२०९-२०१८) दाखलकरण्यात आली होती.त्याची सुनावणी खंडपीठाचे तत्कालीन न्या. रवींद्र बोर्डे यांच्या पुढे झाली होती.न्या.बोर्डे यांनी सरपंचाला अतिरिक्त अधिकार देण्याच्या संदर्भाने निर्णय दिला होता.त्याचा संदर्भ देऊन या प्रकरणात दाखल याचिका खंडपीठाने मंगळवारी फेटाळल्या.