विनयभंग करतानाचा व्हिडीओ शुट करुन तो व्‍हायरल करणाऱ्या नराधम बस चालकाला तीन वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-अल्पवयीन गतीमंद मुलीचा‍ विनयभंग करतांनाचा व्हिडीओ शुट करुन तो व्‍हायरल करणाऱ्या नराधम बस चालकाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली एक लाख २ हजार २०० रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली. अविनाश कैलास शेजुळ (१९, रा. फुलेनगर, पंढरपुर) असे आरोप बस चालकाचे नाव आहे.

प्रकरणात विशेष मुलांच्‍या शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकीने फिर्याद दिली. त्‍यानूसार, १७ जानेवारी २०२० रोजी फिर्यादीला एका मुलाने फोन केला. व व्‍हाट्स अॅपवर एक व्हिडीओ आला असून त्‍यात दोन मुले तुमच्‍या शाळेतील एका मुली बरोबर छेडछाड करत आहे. त्‍यांच्‍यावर कारवाई करा असे म्हणला. त्‍यावर फिर्यादिने व्हिडीओ पाहुन योग्य ती कारवाई करते असे सांगितले. त्‍यानंतर त्‍या मुलीन फिर्यादीच्‍या मोबाइलवर तो व्हिडीओ पाठवला. फिर्यादीने व्हिडीओ पाहिला असता, त्‍यात त्‍यांच्‍या शाळेतील बस चालक अविनाश शेजुळ हा त्‍याच्‍या दोन मित्रांसह शाळेतील आठ वर्षीय गतीमंद मुलीचा विनयभंग करुन तिला मारहाण करताना दिसला. त्‍यानंतर फिर्यादीने ही माहिती पीडितेचे आई वडीलांना व शाळेच्‍या पदाधिकाऱ्यांना  दिली.

१८ जोनवारी २०२० रोजी आरोपी अविनाश शेजुळ याला घटनेचा जाब विचारसण्‍यात आला असता १६ जानेवारी २०२० रोजी दुपारी साडेचार वाजेच्‍या सुमारास शाळासुटल्यानंतर मुलांना सोडायला जात असतांना बसमध्‍ये बनावल्याचे सांगितले. तर काही मुलांनी आरोपी हा कापुन मारुन टाकण्‍याची धमकी देत असल्‍याचे सांगितले. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी फिर्यादीसह, पीडिता आणि तपास अधिकारी तथा तत्‍कालीन पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची साक्ष नोंदवली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी अविनाश शेजुळ याला दोषी ठरवून भादंवी कलम ३५४, पोक्सोचे कलम ८ व १२ अन्‍वये प्रत्‍येकी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड, आणि बालकांचे न्‍यायहक्क संरक्षण कायद्या अन्वये ३ वर्षे सक्तमजरुरी आणि  एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.प्रकरणात अॅड. शिरसाठ यांना अॅड. तेजस्‍वीनी जाधव आणि पैरवी रज्जाक शेख यांनी सहायक केले.