बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई,८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत या संकेतस्थळावर प्रचलित पद्धतीने भरण्याची मुदत दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून शुल्क भरण्याची तारीख शुक्रवार 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.