अजित सीड्सच्या जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मान्यता

औरंगाबाद ,२८जुलै /प्रतिनिधी  :-
अजित सीड्स  कंपनीच्या ‘प्लांट बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर’ ला डॉ. बाबासाहेब 

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २३ जुलै २०२१रोजी पार पडलेल्या तज्ञ समितीच्या  

बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे विद्यापीठामार्फत पी. एचडी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उद्योगाधारित विषयात संशोधन करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
अजित सीड्स प्रा. लि कंपनी पद्माकर मुळे उद्योग समूहाचा एक भाग आहे, ही कंपनी१९८६ पासून दर्जेदार बियाणे देऊन शेतकऱ्यांचा सेवेत आहे. २००७ मध्ये गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील हनुमंतगाव येथे १० हजार चौरसफूट जागेत हे अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेले संशोधन केंद्र सुरू केले आहे. या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या ‘विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाची’ ही (DSIR) 

मान्यता मिळालेली आहे. वनस्पती जैवतंत्रज्ञानाबाबत संशोधन करणे, हा या केंद्राचा 

मुख्य उद्देश आहे. यात जनुक व प्रथिन अभियांत्रिकी, रोगप्रतिकारक शक्ती, 

उती-संवर्धन आणि कीटकशास्त्राचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. पीक संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी विशेष गुणधर्मीय वाण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या केंद्रात संशोधन केले जाते. प्रामुख्याने जनुकशास्त्र, पीक पैदासशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानाद्वारे कापूस, भाजीपाला 

आणि इतरपिकांच्या संकरित तसेच गुणसुत्रासह नवनवीन प्रजाती विकसित करणे, हा 

अजित सीड्सच्या या संशोधन केंद्राचा उद्देश आहे.
स्थापनेपासूनच या केंद्राचीविद्यापीठातील विद्यार्थ्यांना मदत झाली आहे. विविध 

विद्यापीठातील अनेकविद्यार्थ्यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षातील संशोधन प्रकल्प अजित 

सीडसच्या संशोधन केंद्रात पूर्ण केलेले आहेत. तसेच अजित सीड्सने विद्यापीठातील 

अनेक पदवीधर व पदव्युत्तर पदवीधरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. भविष्यातही हे केंद्र जैवतंत्रज्ञान उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तसेच तरुण 

वैज्ञानिक निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण  भूमिका बजावेल.
डॉ. एस. के. रावल(संशोधनसंचालक) यांच्या नेतृत्वाखाली या संशोधन केंद्रात विविध 

विषयातील अनुभवी आणि उच्चशिक्षित  शास्त्रज्ञ   संशोधन करीत आहेत. 

विद्यापीठाकडून ही मान्यता मिळवण्यासाठी डॉ. रावल यांच्यासह डॉ. प्रशांत प्याटी (प्रधान शास्त्रज्ञ) आणि डॉ.पुरुषोत्तम लोमटे (वरिष्ठ शास्त्रज्ञ) यांनी विशेष परिश्रम 

घेतले. विद्यापीठाच्या मान्यतेमुळे अजित सीड्सला मराठवाड्यात कुशल मनुष्यबळ विकसित करण्याकामी भरीव योगदान देता येणार 

आहे.
या उपलब्धीसाठी समूहाचे चेअरमन पद्माकर मुळे, व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे, संचालकरणजीत मुळे आणि इतर सहकाऱ्यांनी डॉ. रावल आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.