डॉ.भारती गोरे यांना ‘स्त्रीशक्ति सन्मान’ जाहीर

सामाजिक सांस्कृतिक संस्था अभियानचे पुरस्कार जाहीर 

येत्या शुक्रवारी राजभवनात वितरण

औरंगाबाद,१८ऑगस्ट /प्रतिनिधी :- मुंबई येथील सामाजिक सांस्कृतिक संस्था अभियाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभाग, साहित्यिक डॉ.भारती बलभिमराव गोरे यांना ‘स्त्री शक्ति सन्मान’ जाहीर झाला आहे.

   सामाजिक सांस्कृतिक संस्था अभियाच्यावतीने चित्रपट, गायन व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दरवर्षी सदर पुरस्कार देण्यात येतात. संस्थेचे सचिव अमरजित मिश्र यांनी सदर पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये राजेश्वरी सचदेव व दिव्या दत्ता (चित्रपट), रेवा राठोर व सोनाली राठोर (गायन) तसेच साहित्य क्षेत्रासाठी डॉ भारती गोरे यांची निवड करण्यात आली.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते  येत्या शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी पाच वाजता राजभवनात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी डॉ गोरे यांचे अभिनंदन केले आहे.  

डॉ.गोरे या २० वर्षांपासून अधापन क्षेत्रात कार्यरत असून निवेदक, लेखक, संशोधक मार्गदर्शक व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. बेटावर कविता संग्रह, ज्योती पर्व अनुवाद, अधुनिक  हिंदी काव्य मिमांसा यासाह विविध ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत.
साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सदर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.