अजित सीड्सच्या जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मान्यता

औरंगाबाद ,२८जुलै /प्रतिनिधी  :-अजित सीड्स  कंपनीच्या ‘प्लांट बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर’ ला डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २३ जुलै २०२१रोजी पार पडलेल्या तज्ञ समितीच्या   बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे विद्यापीठामार्फत पी. एचडी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उद्योगाधारित विषयात संशोधन करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.अजित सीड्स प्रा. लि कंपनी पद्माकर मुळे उद्योग समूहाचा एक भाग आहे, ही कंपनी१९८६ पासून दर्जेदार बियाणे देऊन शेतकऱ्यांचा सेवेत आहे. २००७ मध्ये गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील हनुमंतगाव येथे १० हजार चौरसफूट जागेत हे अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेले संशोधन केंद्र सुरू केले आहे. या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या ‘विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाची’ ही (DSIR)  मान्यता मिळालेली आहे. वनस्पती जैवतंत्रज्ञानाबाबत संशोधन करणे, हा या केंद्राचा  मुख्य उद्देश आहे. यात जनुक व प्रथिन अभियांत्रिकी, रोगप्रतिकारक शक्ती,  उती-संवर्धन आणि कीटकशास्त्राचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. पीक संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी विशेष गुणधर्मीय वाण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या केंद्रात संशोधन केले जाते.

Read more