बलात्‍कार करणाऱ्या नराधमाला अटक

औरंगाबाद,१५जुलै / प्रतिनिधी:-कामावर गेलेल्या आईकडे सोडतो म्हणत १६ वर्षीय मुलीला म्हैसमाळ येथे नेत तिच्‍यावर बलात्‍कार  करणाऱ्या  नराधमाला छावणी पोलिसांनी बुधवारी दि.१४ दुपारी अटक केली. रवि आसाराम दराडे (३२) असे आरोपीचे नाव असून त्‍याला शुक्रवारपर्यंत दि.१६ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी गुरुवारी दि.१५ दिले.

या प्रकरणात १६ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली.  फिर्यादी व त्‍यांचे पती मजुरीकरुन कुटूंबाचा उदर्निवाह करतात. १३ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्‍या सुमारास फिर्यादीही कामानिमीत्त पडेगाव येथे आली होती. त्‍यावेळी पीडिता ही एकटी घरी होती. रात्री आठ वाजेच्‍या सुमारास फिर्यादीला पतीने फोन करुन सांगितले की, पीडिता  बाबा पेट्रोलपंपावर येत असल्याने मी तिला  घेण्‍यासाठी जात असल्‍याचे सांगितले.

पीडिता घरी आल्यावर फिर्यादीने तिच्‍याकडे चौकशी केली. तेव्‍हा तिने सांगितले की, सकाळी ११ वाजेच्‍या सुमारास पीडिता ही फिर्यादीकडे जाण्‍यासाठी निघाली होती. तेव्‍हा तारांगण जवळील रोडवर आरोपी रवि दराडे भेटला, त्‍याने मी तुला आईकडे नेऊन सोडतो अशी बतावणी करुन दुचकीवर बसवले. त्‍यानंतर त्‍याने पीडितेला म्हैसमाळ येथे नेले. तेथे एका खोलीवर नेत पीडितेवर बलात्‍कार केला. त्‍यानंतर आरोपीने पीडितेला दुचाकीवर सिल्लोड येथे नेले. तेथे एका व्‍यक्तीकडून मोबाइल घेवून घरी फोन करुन सिल्लोडला असल्याची माहिती दिली. ही बाब आरोपीला माहिती होताच आरोपीने पीडितेला औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी वाहनात बसवून दिले.या  प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी गुन्‍ह्यात आरोपीला कोणी मदत केली का ? याचा आणि आरोपीने कोणाच्‍या सांगण्‍यावरुन गुन्‍हा केला याचा तपास बाकी असल्‍याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.