खासगी शाळांना 50 टक्के शुल्क कमी करण्याबाबत तातडीने आदेश द्या

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबई,१५जुलै /प्रतिनिधी :-खासगी शाळांना 50 टक्के शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकारने तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

श्री. भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, पालकांचा कळवळा आला म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकार खासगी शाळांना  शुल्क कमी करण्यास तेही 15 टक्के सांगण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.आघाडी सरकारने आता विचार करणे थांबवून खासगी शाळांना 15 टक्के नव्हे तर 50 टक्के शुल्क कमी करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.

पालकांनी शुल्कवाढीविरोधात केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने नेहमीच पाठिंबा दिला आहे. या पुढेही  आम्ही पालकांच्या मागे खंबीरपणे उभे राहू, असे श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.