लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 95 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला

गेल्या 24 तासांत, लसीच्या 46 लाख 57 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

सध्याचा रोगमुक्ती दर 98.00% आहे; मार्च 2020 पासून आतापर्यंतचा उच्चांकी दर

गेल्या 24 तासांत देशात 18,132 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,27,347) एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.67%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.53%) गेले 108 दिवस हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 46,57,679 मात्रा देण्यात आल्यामुळे, देशातील कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 95 कोटींचा (95,19,84,373) महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात 92,57,689 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 21,563 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,32,93,478 झाली आहे. परिणामी, सध्या, देशातील रोगमुक्ती दर 98.00% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा सर्वोच्च रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 106 दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी राखण्यात यश आले आहे. गेल्या 24 तासांत, 18,132 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात नोंदल्या जाणाऱ्या कोविड रुग्णांची गेल्या 215 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 2,27,347 इतकी आहे, गेल्या 209 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.67% आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,35,797 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 58 कोटी 36 लाखांहून अधिक (58,36,31,490) चाचण्या करण्यात आल्या. देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात आहे, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.53% असून गेले 108 दिवस हा दर 3%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.75% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 42 दिवस 3% हून कमी आहे आणि गेले सलग 125 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.