औरंगाबाद शहरात पूर्णतः अनलॉक आणि ग्रामीणमध्ये नियम काही प्रमाणात शिथिल,शहर 1 तर ग्रामीण भाग तिसऱ्या पातळीवर

औरंगाबाद जिल्ह्यासाठी निर्बंधातील शिथिलतेच्या मर्यादेबाबत आदेश निर्गमित

निर्बंधात शिथिलता असली तरी नियमांचे काटेकोर पालन करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

  • दर शुक्रवारी घेतला जाणार आढावा; संक्रमण वाढताच निर्बंध होणार अधिक कडक
  • धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय बंद
  • दुकानांमधील कर्मचाऱ्यांच्या RTPCR चाचण्या बंधनकारक

औरंगाबाद,६ जून /प्रतिनिधी:-

औरंगाबाद  जिल्ह्यातील कोविड-19ची परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे जिल्हयातील (ग्रामीण) रुग्णांची टक्केवारी 5.46 टक्के (Positivity) असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची टक्केवारी 20.34टक्के असल्याने औरंगाबाद ग्रामीणची वर्गवारी नुसार सध्याचे स्थान Level- 3 (पातळी 3) मध्ये आहे तर औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी 2.24 टक्के (Positivity) असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची टक्केवारी 22.19 टक्के असल्याने औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राचे शासन वर्गवारी नुसार स्थान सध्या Level-1 (पातळी 1) मध्ये आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या लक्षात घेता संपूर्ण आठवड्यामध्ये सायंकाळी 05 वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असणार आहे. अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागातील मॉल, चित्रपट गृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद असणार आहेत. ग्रामीण भाग हा भौगालिकदृष्ट्या मोठा असून लोकसंख्या देखील जास्त असल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करुन सजगता बाळगावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दर शुक्रवारी बैठक घेण्यात येणार असून जिल्ह्यातील संक्रमण वाढत राहिले तर निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असून जनतेच्या मुक्त जीवन जगण्यावर मर्यादा येणार असल्याने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन  करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. 

                जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय पुर्णपणे बंद राहणार आहेत. सर्व उदयोग,व्यवसाय व खाजगी आस्थापना, दुकाने व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहिल.(वैधता 15 दिवसांकरिता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान/व्यवसाय सुरु करता येणार नाही. जिल्हृयातील दुकानदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी येत्या 5 ते 7 दिवसांत करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. जिल्हा प्रशासनाने चाचणी करण्यासाठी पुरेसा अवधी दिला असल्याने चाचणी न करुन घेणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. RTPCR चाचणी करण्यासाठी जिल्ह्यात घाटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे  अशा दोन ठिकाणी 24 तास लॅब कार्यरत असून चिकलठाणा येथेील जिल्हा रुग्णालयात Mobile Van (क्षमता दररोज 2500 ते 3000 चाचण्या)च्या माध्यमातून तसेच खाजगी लॅबमध्ये देखील RTPCR चाचणी करण्यात येते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी येत्या 5 ते 7 दिवसांत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

औरंगाबाद महापालिका क्षेत्राकरिता आदेश-

स्थानिक पातळीवर कोविड-19 संसर्ग साखळी  तोडणे Break the Chain व कोरोना विषाणू प्रार्दूभाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर व आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राकरिता 7 जुन रोजीचे सकाळी 7.00 वाजे पासून पुढील आदेशापर्यंत खालील प्रमाणे निर्बंध शिथिल करुन सुधारित आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

अ.क्र.बाब/तपशीलनिर्बंधांबाबत सुचना
1.        अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकानेभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे उघडण्यास परवानगी राहिल.
2.       अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतीरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकानेभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे उघडण्यास परवानगी राहिल.
3.       मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहेभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे उघडण्यास परवानगी राहिल.
4.     रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे उघडण्यास परवानगी राहिल.
5.      सार्वजनिक ठिकाणे/क्रीडांगणे,मोकळया जागा,उद्याने/बगिचे,Morning Walk व सायकलींगभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे उघडण्यास परवानगी राहिल.
6.       खाजगी आस्थापनाशासन आदेश दिनांक 04 जून 2021 च्या निर्देशानुसार सर्व आस्थापना जसे, खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर-बँकींग वित्त-संस्था इ. कार्यालये नियमीतपणे कार्यालयीन वेळेपर्यंत 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तथापी भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटींचे पालन करणे आवश्यक राहिल.
7.      कार्यालयीन उपस्थितीशासकीय/निमशासकीय/खाजगीशासन आदेश दिनांक 04 जून 2021 च्या निर्देशानुसार सर्व आस्थापना नियमीतपणे कार्यालयीन वेळेपर्यंत 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तथापी भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटींचे पालन करणे आवश्यक राहिल. 
8.      क्रीडाभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर परवानगी राहिल.
9.       चित्रीकरण (Shooting)भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर चित्रीकरणास परवानगी राहिल.
10.   स्नेहसंमेलने(Gathering), सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रमभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
11.    विवाह संमारंभभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
12.   अंत्यविधीभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
13.   सभा / निवडणुका,स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभाभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
14.  बांधकामभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
15.   कृषी संबंधीत बाबीभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
16.   ई-कॉमर्स वस्तु व सेवाभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
17.  जमावबंदी/संचारबंदीलागु नाही.
18.   जीम/ सलुन/ ब्युटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटरभारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे उघडण्यास परवानगी राहिल.
19.   सार्वजनिक बस वाहतूकपूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहिल. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहिल. तसेच भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटींचे पालन करणे बंधनकारक राहिल.
20.  कार्गो वाहतूक सर्व्हीसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह)नियमितपणे पूर्ण वेळ परवानगी राहिल. तथापी भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटींचे पालन करणे बंधनकारक राहिल.
21.   अंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस) व ट्र्रेनपूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहिल. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहिल. तसेच भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटींचे पालन करणे बंधनकारक राहिल. तथापी जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्यक राहिल.
22.  उत्पादन क्षेत्र (Export Oriented Units) (निर्यात प्रधान उद्योग)भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
23.  उत्पादन क्षेत्र (1. अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादक पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा 2. निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग 3. संरक्षण संबंधित उद्योग 4. डेटा सेंटर/ क्लॉवुड सर्व्हिस प्रोवायडर/ माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग)भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
24.             उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग व शासनाच्या आदेश दि. 04 जून 2021 मधील मुद्दा क्र. 23 व 24 मधील बाबी वगळून इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा)भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सुचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की,‍ फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे या अटीवर नियमीतपणे परवानगी राहिल.
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.
             कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे(Levels of Restrictions for Breaking The Chain) आदेश दिनांक 04 जून 2021 नुसार अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बाबी : 
अत्यावश्यक सेवा :
1.रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्‍सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश
असेल. लस, निर्जतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत  कच्चा माल उद्योग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल.
2. शासकीय व खाजगी  पशुवैद्यकीय सेवा,  दवाखाने, पशु संगोपन केंद्र व  पशु खादयाची दुकाने.
3. सर्व वने व त्यासंबंधीत विभागाच्या अत्यावश्यक बाबी.
4.विमान व त्यासंबंधी पूरक सेवा (हवाई सेवा, विमानतळे तत्संबंधी दुरुस्तीसेवेच्या बाबी, कार्गो सेवा
5.किराणा सामानाची  दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई / चॉकलेट / केक/ खाद्य/‍मटन, चिकन, अंडी, मासे इ. दुकाने.
6. शितगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा 
7.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
8.स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा.
9.स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .
10.  रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा
11. सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था , स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ12.  दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी13.  मालाची / वस्तुंची वाहतूक.14. पाणीपुरवठा विषयक सेवा15.  शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्व कामामध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्व अनुषंगिक सेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचाही समावेश असेल.
16.  सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची व उत्‍पादनाची आयात – निर्यात
17. ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत)
18.  मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा
19.  पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा 
20. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
21.  डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा   सेवा 
22. शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा 
23. विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा
24.  ATM’s
25. पोस्टल सेवा 
26. कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)                                         
27.अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग
28. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा
29. सर्व ऑप्‍टीकल्‍स् शॉप.
30. वाहतूक व्‍यवस्‍थेशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्क शॉप, सर्व्‍हीस सेंटर व स्‍पेअर्स पार्ट विक्री आस्‍थापना
31.  या व्यतिरिक्त कोणतीही सेवा जी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा म्हणून घोषित केली आहे.
a. सर्व उदयोग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहिल. (वैधता 15 दिवसांकरिता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान/व्यवसाय सुरु करता येणार नाही.
b. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोराना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबंधित दुकान/आस्थापना बंद ठेवण्यात येईल, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.
c. उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात (नागरी भागात) आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander तथा जिल्हाधिकारी/तहसिलदार, औरंगाबाद यांची राहिल.
d. सदरचे आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील  
           सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 07 जून 2021 चे सकाळी 07.00 वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत लागु राहिल.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
 
 ग्रामीण भागाकरीता आदेश-
 
            कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Break the Chain) सुधारित अटी व शर्ती अंमलबजावणीस्तव आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद व पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद शहर वगळून उर्वरीत जिल्हा क्षेत्राकरिता 7 जुन रोजीचे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल (Restriction Relaxation )करुन सुधारित आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
 
अ.क्र.
बाब/तपशील
निर्बंधांबाबत सुचना
1सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना संपूर्ण आठवड्यामध्ये सायंकाळी 05.00 वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असेल.
2अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
3अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतीरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 वाजेपर्यंत
4.मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहे पूर्णपणे बंद
5.रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी
सोमवार ते शुक्रवार (Week Days) सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत 50% आसन क्षमतेनुसार Dining
·         सायं. 4.00 नंतर पार्सल सेवा चालु राहिल व
·          शनिवार आणि रविवार (Weekend) फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहतील.
6.सार्वजनिक ठिकाणे/क्रीडांगणे,मोकळयाजागा,उद्याने/ बगिचे,Morning Walk व सायकलींग दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत
7 .खाजगी आस्थापना
सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत शासन आदेश दिनांक
04 जून 2021 च्या निर्देशानुसार वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना जसे,
खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर-बँकींग वित्त-संस्था इ. कार्यालये नियमीतपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील.
8. कार्यालयीन उपस्थिती
शासकीय/निमशासकीय/खाजगी इतर कार्यालये क्षमतेच्या 50%
·      कोरोना विषयक कामे करणा-या आस्थापना, कृषी, बँक मान्सुनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
 
9. क्रीडा
बाहेर मोकळया जोगत (Out Door) सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 व सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत.
 
10.चित्रीकरण (Shooting) सायंकाळी 4.00 वाजे पर्यंत मुभा
·   सायंकाळी 05.00 वाजेनंतर कुठेही वावरण्यास मनाई (No Movement Outside Bubble)
11.स्नेहसंमेलने(Gathering), सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम
सोमवार ते शुक्रवार सभागृह/हॉल आसन क्षमतेच्या 50% उपस्थितीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
12..विवाह संमारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत
13. अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत
14.सभा / निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा सभागृह/हॉल आसन  क्षमतेच्या 50%
15.बांधकाम फक्त बांधकाम साईटवर निवासी/वास्तव्यास मुभा
·  बाहेरुन मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
16.कृषी संबंधीत बाबी संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
17.ई-कॉमर्स वस्तु व सेवा नियमित पूर्ण वेळ : दररोज
18.जमावबंदी/संचारबंदी
·         जमावबंदी (5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मज्जाव) सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत,
·         संचारबंदी सायंकाळी 05.00 नंतर (फक्त अत्यावश्यक कामांसाठी मुभा)
19.जीम/ सलुन/ ब्युटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50%
पूर्व- परवानगीसह (Appointment), ए.सी. च्या वापरास मनाई.
20.सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.
21 .कार्गो वाहतूक सर्व्हीसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह) नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज.
22.अंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस) व ट्र्रेन नियमीतपणे, जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून
अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्यक राहिल.
23 .उत्पादन क्षेत्र (Export Oriented Units) (निर्यात प्रधान उद्योग)
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज
24.उत्पादन क्षेत्र (1. अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादक पॅकेजींग व
संपूर्ण साखळीतील सेवा 2. निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग 3. संरक्षण संबंधित उद्योग
4. डेटा सेंटर/ क्लॉवुड सर्व्हिस प्रोवायडर/ माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग)
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज
25.उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग व शासनाच्या आदेश दि. 04 जून 2021
मधील मुद्दा क्र. 23 व 24 मधील बाबी वगळून इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा)
50% स्टाफचे हालचालीचे परवानगीसह
( With Transport Bubble )
 
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.
        1)मास्क वापरणे  2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3)सॅनीटायझर 4)आवश्यकतेनूसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य