कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा – उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांचे आवाहन

वैजापूर ,१४ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- त्रिपुरा येथील घटना व राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शांतता समितीची बैठक रविवारी वैजापूर येथे पार पडली. शहर व तालुक्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखून कोणत्याही अफवेला बळी न पडण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस  अधिकारी कैलास प्रजापती यांनी बैठकीत केले.तहसीलदार राहुल गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले.
शांतता समितीच्या या बैठकीस भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,माजी उपनगराध्यक्ष हाजी अकीलसेठ, नगरसेवक राजुसिंग राजपूत,प्रकाश चव्हाण, दशरथ बनकर,गणेश खैरे,इम्रान कुरेशी, काझी हाफीझोद्दीन, व्यापारी संघटनेचे काशीनाथ गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, कैलास पवार,रवींद्र पाटणी,युवासेनेचे आमीर अली,आवेज खान, सुधीर लालसरे आदी उपस्थित होते.