एमजीएमच्या बालरोग विभागाचा बालकदिन,डॉक्टरांनी रुग्ण मुलांसोबत केली धमाल

औरंगाबाद,१४ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मुले म्हणजे देवा घरची फुलं असे म्हणत एमजीएम रुग्णालयातील बालरोग विभागात पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालकदिन साजरा करण्यात आला.

Displaying IMG-20211113-WA0037.jpg

यानिमित्ताने सकाळी ९.३० वाजेपासून दोन महिने ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांची संपूर्ण तपासणी करुन सदृढ बालक स्पर्धा झाली. तसेच दुपारी १२ वाजेपर्यंत आलेले रुग्ण व त्यांच्या पालकांसोबत डॉक्टरांनी गाण्याच्या भेंड्या, लहान मुलांचेे डान्स, बालगीते गाऊन धमाल केली. तसेच कोरोना आणि मी या विषयावर मुलांसाठी निबंध स्पर्धाही झाली.  या वेळी प्रमुख पाहुण म्हणून उपाध्यक्ष डॉ. पी.एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजन बोहरा, डॉ. राजेश कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. एच.आर.राघवन, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. जे.आर. काकडे, डॉ. अंजली काळे, विभागप्रमुख डॉ. माधुरी इंगळे  यांच्या हस्ते विजेत्या मुलांना बक्षीसे देवून सन्मानित करण्यात अाले. डॉ. हसीब मोहम्मद यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. मधुरा राज्यम, डॉ. सुवर्णा मगर, डॉ. अविनाश सांगळे यांनी सहकार्य केले.

Displaying IMG-20211113-WA0039.jpg

विजेत्या मुलांची नावे

Displaying IMG-20211113-WA0036.jpg

बालक स्पर्धा २ महिने ते २ वर्ष वयोगट

अप्पी थोरात – प्रथम, अदिती भोकर द्वितीय, शौर्य शिंदे – उत्तेजनार्थ

३ ते ४ वर्ष वयोगट

अनुष्का उपाध्याय – प्रथम, प्रज्ञेश देशमुख- द्वितीय, सक्षम शाहपुरे – उत्तेजनार्थ

४ ते ५ वर्ष वयोगट

बाबासाई अहिवाल -प्रथम, प्रिया साळवे- द्वितीय, श्रीजीत सपाटे- उत्तेजनार्थ

निबंध स्पर्धा- वेदा राज्यम -प्रथम, इनाया इब्राहिम- द्वितीय, ऋतुजा थोरात -उत्तेजनार्थ.