वैजापूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. दिनेश परदेशी तर उपाध्यक्षपदी साबेर खान

वैजापूर ,​७​ एप्रिल  / प्रतिनिधी :- ‘एक गाव एक जयंती’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी तर कार्याध्यक्षपदावर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष साबेरखान, सचिवपदी माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी

उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, मर्चट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक राजेंद्र गायकवाड, पारस घाटे, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण, दशरथ बनकर, उल्हास ठोंबरे, प्रकाश चव्हाण, ज्ञानेश्वर टेके , निलेश भाटीया , बिलाल सौदागर बबन त्रिभुवन, शेख रियाज अकील, राजुसिंग राजपूत, गणेश खैरे, सुप्रिया व्यवहारे, सुरेश तांबे, सचिन वाणी, इमरान शेख, गोकुळ भुजबळ, सखाहरी बर्डे, स्वप्निल जेजुरकर ,बजरंग मगर परेश भोपळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुक्रवारी ता.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अभिवादनाचा कार्यक्रम होईल तसेच सायंकाळी चार वाजता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्रतिमेची भव्य मिरवणुक काढली जाईल.

माजी नगराध्यक्ष साबेरखान

या जयंती महोत्सवात मोठयासंख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मित्र मंडळ, रमाई चौक मित्र मंडळ, दुर्गानगर मित्र मंडळ, इंदिरानगर मित्र मंडळ, पंचशील नगर मित्र मंडळ, न्यु वॉरियर्स ग्रुप, जीवन गंगा सोसायटी, वैजापूर तालुका व्यापारी असोसिएशन व वैजापूर वकील संघ, वैजापूर तालुका डॉक्टर असोसिएशन, मराठी पत्रकार संघ, महसुल कर्मचारी तलाठी संघटना, मुप्टा शिक्षक संघटना यांनी केले आहे.