भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

May be an image of 3 people, people sitting, people standing and indoor

औरंगाबाद  ,१२ मे /प्रतिनिधी  :-  
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण बघता रक्ताचा साठा वाढवण्याची गरज आहे. याच उद्देशाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे चिकलठाणा मंडळात मुकुंदवाडी, गुलमंडी मंडळातील वरद गणेश मंदिर व सातारा देवळाई मंडळातील खंडोबा मंदिर शेजारी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.

May be an image of 1 person, standing and text that says 'कोरोनाच्या भारतीय जनता पार्टी, संभाजीनगर. हामारी मुळे सध्या संपुर्ण महाराष्ट्रात तरी ंनी रक्तदान करून शकता. रक्ताचा તુ'

त्याप्रसंगी खा.डॉ.भागवत कराड, विजयाताई रहाटकर, भाऊराव देशमुख, संजय केनेकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, राजेश मेहता, समीर राजूरकर, राज वानखेडे, माधुरीताई आदवंत, अमृताताई पालोदकर, श्रीमती लताताई दलाल, रामेश्वर भादवे, राजेंद्र साबळे, शिवाजी इंजे पाटील, किसन ठुबे, हर्षवर्धन कराड, दीपक खोतकर, सिद्धार्थ साळवे, प्रवीण कुलकर्णी, मनोज भारस्कर, सुबोध शिंदे, बंडू ठुबे, श्री.ज्ञानेश्वर बोरसे, श्री.राहुल रोजतकर, श्री.मन्सूर पटेल, श्री.पावन सोनवणे, श्री.अमोल झलक, श्री.अजय पारेख, श्री.विशाल होनवणे, श्री.करण खिमणार, श्री.किशोर राजपूत, श्री.अमर पळसकर, आदींची उपस्थिती होती.

May be an image of 4 people, people sitting and people standing

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आजच्या परिस्थितीत रक्तदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या थोड्याशा रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. म्हणून ज्याला शक्य असेल त्या प्रत्येकाने रक्तदान अवश्य करावे असे आवाहन औरंगाबाद पूर्वचे भाजपा आमदार अतुल सावे यांनी केले.