“हर घर दस्तक” मोहिमेअंतर्गत वैजापूर शहरात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैजापूर,१२ डिसेंबर /प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार वैजापूर नगरपालिकेच्यावतीने शहरात 8 डिसेंबरपासून “हर घर दस्तक” मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत रविवारी शहरातील प्रभाग क्र.5 मध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले.या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 11 प्रभागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रभागात पथक नियुक्त करण्यात आले आहे. आज क्र.5 मध्ये या प्रभागाचे नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी मर्चंट बँकेचे माजी चेअरमन भगवान नाना तांबे, संचालक विजय वेद, शैलेश पोंदे, रहीम खान, युवासेनेचे आमिर अली, शिवसेना शाखाप्रमुख आवेज खान, रियाज पठाण यांची उपस्थिती होती.पालिकेचे शिक्षणाधिकारी मनिष गणवीर यांच्या नियंत्रणाखाली पर्यवेक्षक आर.डी.वसावे, पथकप्रमुख एस.एम.दुधमल, एस.एस.कुमावत, श्रीमती द्वारका शिंदे, वर्षा शिंदे, रोहिणी देशमुख, शिक्षिका उर्मिला गायकवाड, मंगल गायकवाड, भरत जगताप व वाल्मिक दळवी यांच्या पथकाने ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवली.