उद्योजकाला 56 लाखांना गंडविल्याप्रकरणी दोन भामट्यांना अटक

औरंगाबाद, दिनांक 07 :भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डिलरशीप देण्याचे फेक जाहिरातीव्दारे आमिष दाखवून उद्योजकाला 56 लाखांना गंडविल्याप्रकरणी औरंगाबाद सायबर पोलिसांनी झारखंडच्या आणखी 5 नोव्हेंबर रोजी अटक केली. दोघा आरोपींना झारखंड येथून अटक करित ट्रांझिट वारंट व्दारे आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी रविवारी दि.8 दिले. राजनकुमार नवल किशोर प्रसाद (30, रा. तारानगर, बोकारो झारखंड) आणि विनोदकुमार सिंह रामजीसिंह (40, रा. शिवशक्‍ती कॉलनी, सकरा, बोकारी झारखंड) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणात यापूवी आरोपी कालु शेख नेश मोहम्मद उर्फ शहाजहान (36) व मोहम्मद अहसान रजा मोहम्मद ताहेर अलम उर्फ करिम (28) या दोघांना अटक करण्यात आली. पोलिस कोठडी दरम्रून मुख्य आरोपी  नितीश कुमार जितेंद्र सिंग (रा. हतीयारी विमनवा काशी चौक नालंद, बिहार) याच्या सहाय्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. न्यायालयाने दोघा आरोपींच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
वाळुज औद्योगिक वसाहतीत चांगदेव सोमीनाथ तांदळे (49, रा. सिडको वाळुज महानगर-1, प्लॉट क्र. 10, सिडको कार्यालयाजवळ) यांची रविकिरण इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. शहरातील एका दैनिकात 1 ऑगस्ट 2019 रोजी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या  गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशीत झाली होती. या जाहिरातीव्दारे भामट्यांनी तांदळे यांना सुमारे 56 लाख 64 हजार 700 रुपयांना गंडा घातला. प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान अरोपी राजनकुमार नवल व विनोदकुमार सिंह या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी मुख्य आरोपी नितीशकुमार सिंग याला अटक करणे आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील रक्‍कम जप्‍त करणे आहे. मुख्य आरोपीने गुन्ह्यातील रक्‍कमेतून खरदे केलेली गाडी आरोपी विनोदकुमा सिंह याला दिली आहे.  नितीशकुमार याने आईच्या नावे जमीन खरेदी केली आहे. आरोपींकडुन गुन्ह्यात वापरलेली बँक खात्यांची तपासणी करणे आहे. आरोपींनी गुन्ह्याच्या रक्‍कमेतून विविधी वाहन खरेदी केली आहेत ती देखील जप्‍त करणे आहे. आरोपीच्या साथीदारांना अटक करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आदेश दिले.