डॅा.जितेंद्र देहाडे यांनी लसीचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

औरंगाबाद ,२९ एप्रिल /प्रतिनिधी 

महाराष्ट्र ​ ​​प्रदेश काँग्रेसच्या अनु.जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॅा.जितेंद्र देहाडे यांनी कोरोना लसीचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधे जमा केले आहे. 
महाविकास आघाडी सरकारने नुकताच १८ ते ४४ वयाच्या नागरिकांना मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे. सदरील निर्णयाचे डॅा.जितेंद्र देहाडे यांनी स्वागत केले असून आपल्यासह  परिवारातील सदस्यांच्या लसीचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दिले आहेत.

डॅा.देहाडे यांची नेहमी समाजकार्यामधे आग्रही भूमीका असते. त्यांनी आवाहन केले आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या लसीचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावेत जेणेकरुन कोरोना परिस्थितीत राज्य सरकारला मदतीचा हातभार लागेल.

डॅा.जितेंद्र देहाडे यांच्या या निर्णयाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अमित देशमुख, सतेज पाटील यांनी ट्वीटर वर अभिनंदन केले आहे.