सामाजिक समन्यायासाठी जिल्हा नियोजनाची गरज-अर्थतज्ज्ञ डॉ. ज.फा.पाटील यांचे प्रतिपादन

औरंगाबाद, दि.२७ : लोकशाही शासन व्यवस्थेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ पोहोचले पाहिजेत. आपल्या देशात सामाजिक समन्यायाकरिता व आर्थिक सुबत्तेकरता अधिक प्रभावशाली जिल्हा नियोजनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ जे एफ पाटील यांनी केले.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ अनुदान प्रायोजित (यूजीसी) ‘सेंटर विथ पोटेन्शियल फोर एक्सलन्सतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग फॉर टॅपिंग डेव्हलपमेंट पोटेन्शियल’ या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन गुरुवारी (दि.२६) करण्यात आले. कुलगुरू डॉ.  प्रमोद येवले उदघाटन सत्राचे अध्यक्षस्थानी होते. उदघाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील प्रख्यात अर्थतज्ञ प्रा ज फा पाटील उपस्थित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या तीन विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. संयोजक  डॉ. धनश्री महाजन, विभागप्रमुख डॉ शुजा शाकेर, डॉ सुनील नरवडे, डॉ स्मिता अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रख्यात अर्थतज्ञ तसेच राज्य व केंद्र पातळीवर नियोजनाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष भाग घेतलेलय  डॉ ज फा पाटील यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये बलवंतराय मेहता समिती पासून जिल्हा नियोजनाच्या बाबतीतील संपूर्ण ऐतिहासिक आढावा समोर मांडला. तसेच जिल्हा नियोजनाचे विविध पैलू त्याचे महत्त्व आणि विविध राज्यांमधील त्याची अंमलबजावणी या बाबतीमध्ये स्वानुभवावर आधारित वस्तुस्थितीचे कथन केले. सामाजिक समन्यायाकरिता व आर्थिक सुबत्तेकरता जिल्हा नियोजनाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.
*प्रगतीसाठी आपली क्षमता ओळखा : कुलगुरू*
   कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रमोद येवले यांनी सीपीपी ए अंतर्गत झालेल्या चर्चासत्रंवर आधारित संपादित पुस्तकांचे अनावरण करून प्रकाशन केले आपल्याअध्यक्षीय समारोपात मा कुलगुरू यांनी मराठवाड्याच्या विकास विषयक क्षमतेबाबत आणि त्याच्याशी निगडीत समस्यांबाबत वस्तुस्थितीची मांडणी केली. मराठवाड्यातील ७५ टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे शेती क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम दरडोई उत्पन्नावर होतो तसेच जीवनमानावरही होतो, ही वस्तुस्थिती त्यांनी प्रतिपादन केली आणि मराठवाड्याच्या विकासासाठी मराठवाड्याच्या क्षमता ओळखण्याची गरज  कुलगुरू डॉ येवले यांनी अधोरेखित केली.या उदघाटन सत्राकरिता केंद्राच्या सल्लागार समितीचे मान्यवर सदस्य प्रा सर्जेराव ठोंबरे , डॉ एस टी सांगळे, प्रा स्मिता अवचार, प्रा शूजा शाकीर ,  प्रा  अशोक पवार  आदी उपस्थित होते. याशिवाय प्रा सी एन कोकाटे, प्रा कृतिका खंदारे, प्रा पांडुरग कल्याणकर, प्रा अपर्णा कोत्तापल्ले, प्रा कुमार,  प्रा बाबर यांची उद्घाटन सत्राला उपस्थिती होती. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ शाकीर यांनी केले. तर त्यानंतरच्या शोधनिबंध वाचन सत्रांचे सूत्रसंचालन डॉ कृतिका खंदारे यांनी केले. ‘सेंटर विथ पोटेन्शियल फोर एक्सैलेन्स’च्या मुख्य समन्वयक डॉ धनश्री महाजन यांनी केंद्राच्या वाटचालीबाबत उदघाटनाच्या सत्रात माहिती दिली.या कार्यक्रमात शनिवारी (दि. २७) जिल्हा नियोजनाच्या विविध आंतरविद्याशाखीय पैलूंवर चर्चा झाली. समारोप समारंभासाठी मुंबई विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या संचालक प्रा मनीषा कारणे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थान डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ जे जी साबळे, रामेश्वर तांबे आणि रवींद्र कदम यांनी परिश्रम घेतले.