“मानवतेचा जागर” या कार्यक्रमांतर्गत वैजापूर येथील मदरसा खालिद बिन वलिद येथे महारक्तदान शिबीर

वैजापूर ,७ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- रक्तदान हे एक चांगले कार्य असून रक्तदानाने माणूस माणसांशी केवळ जोडलाच जात नाही तर तो मानवतेच्या नात्याशी जोडला जाऊन वैश्विक मानवता निर्माण होते.असे उदगार आ.रमेश पाटील बोरणारे यांनी काढले.

Displaying IMG_20211107_171415.jpg

वैजापूर येथील बेलगांव रस्त्यावर असलेल्या मदरसा खालिद बिन वलिद व एम.जी.एम.उर्दू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने “मानवतेचा जागर” या कार्यक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.माजी नगराध्यक्ष साबेरखान,भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी.साहित्यिक इकबाल मिन्ने, वंचित आघाडीचे हाजी अकिलसेठ,स्वछता दूत ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अनेक तरुणांनी रक्तदान करून यामध्ये सहभाग नोंदविला. रक्तपेढीचे डॉ.हाशमी,डॉ.ओवेस,डॉ.सादीया यांचे याकामी सहकार्य मिळाले. या शिबिराप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, नगरसेवक प्रकाश चव्हाण, दशरथ बनकर, दिनेश राजपूत, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरेशी,बिलाल सौदागर, मजीद कुरेशी,शमीम सौदागर,सुलतान कुरेशी,रशीद कुरेशी,काझी हाफीजोद्दीन, युवासेनेचे आमेर अली, मदरशाचे नाजीम साबीर सहाब यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.