विनयभंग प्रकरणी आराेपीला वर्षाची सक्तमजुरी

औरंगाबाद, दिनांक 20 :विवाहित महिलेच्या घरात दारूच्या नशेत घुसून विनयभंग केल्याप्रकरणी तुराबशहा उस्मानशहा (रा. शरीफ काॅलनी, भाेकरदन) याला एक वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. नेहारकर यांनी शनिवारी सुनावली. 

पीडित महिलेचा १७ नाेव्हेंबर २०१६ राेजी आराेपी तुराबशहा हा घरी जाण्यासाठी उशीर झाला म्हणून रात्री ११ वाजता घुसला. सकाळी उठून जाताे म्हणून पीडितेच्या घरात झाेपण्याच्या बहाण्याने थांबला. पीडितेचे मुले झाेपल्यानंतर जवळ जाऊन विनयभंग केला. पीडिता घाबरून घराबाहेर पडली व हर्सूल पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली. सरकारी वकील सय्यद शहनाझ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नाेंदवले. जबाब व साक्षीपुराव्याच्या आधारे न्यायालयाने आराेपीला दाेषी ठरवून भादंवि कलम ३५४ खाली एक वर्षे सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दंडातील ८०० रुपये पीडितेला द्यावेत, असे न्या. नेहारकर यांनी आदेशात म्हटले. याप्रकरणी सरकारी पक्षाला पैरवी अधिकारी व्ही. के. शिसाेदे, सी. एल. गांगुर्डे यांनी मदत केली.