औरंगाबाद जिल्ह्यात 142 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 32415 कोरोनामुक्त, 2353 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 14 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 309 जणांना (मनपा 258, ग्रामीण 51) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 32415 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 142 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35776 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1008 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2353 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आणि ग्रामीण भागात 25 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (64) पाटोदा (1), मांडकी (1), पिशोर, कन्नड (1), हिवरखेडा, कन्नड (3), अंबेलोहोळ, गंगापूर (1), भेंडाळा, गंगापूर (7), बजाज नगर (3), दत्त कॉलनी, वाळूज (1), शिवकृपा नगर, कचनेर (1), वाकळा, वैजापूर (2), नांदरा,पैठण (3), गारज, वैजापूर (1), बाभूळगाव, वैजापूर (1), वरचा पाडा शिऊर वैजापूर (1), पिंपळवाडी, पैठण (1), तांदुळवाडी, गंगापूर (1), शिऊर, गंगापूर (1), गणपती बोरगाव, फुलंब्री (1), चित्तेगाव (1), चंद्रलोक नगरी, कन्नड (5), आदर्श कॉलनी, कन्नड (1), फुलंब्री (1), गंगापूर (1), कन्नड (9), सिल्लोड (9), वैजापूर (1), पैठण (4), सोयगाव (1)

मनपा (23) गुरू रामदेव नगर (1), एन अकरा हडको (1), उल्कानगरी (1), वेदांत नगर (1), सातारा परिसर (1), बीड बायपास परिसर (1), एन अकरा सिडको (2), एन अकरा सुदर्शन नगर (2), जाधववाडी, मयूर पार्क (1), एन दोन विठ्ठल नगर (1), एन आठ सिडको (3), अन्य (1), शिवेश्वर कॉलनी (2), मुकुंदवाडी (2), एन दोन संघर्ष नगर (1), हुसेन कॉलनी (1) उस्मानपुरा (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत टीव्ही सेंटर येथील 78 वर्षीय पुरूष, हर्सुल येथील 66 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात युनुस कॉलनीतील 58 वर्षीय्‍ पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.