मोहोटा देवी संस्थांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी  पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तत्कालिन जिल्हा न्यायाधीश व  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

औरंगाबाद  अहमदनगर येथील  जगदंबा देवी मंदिर, मोहोटा, तालुका पार्थर्डी येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी  जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहोटा चे माजी विश्वस्थ नामदेव गरड यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना तक्रार देऊन देवस्थान येथील आर्थिक गैरव्यवहाराबद्दल गुन्हा नोंद करण्याची विनंती केली होती. सदर तक्रारींवर पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे  उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करून देवस्थान येथील गैरव्यवहार संबंधी कार्यवाहीची मागणी केली होती.

अहमदनगर येथील सुप्रसिद्ध जगदंबा देवी मंदिर, मोहोटा, तालुका पार्थर्डी येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी श्री. जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहोटा चे माजी विश्वस्थ श्री. नामदेव गरड यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना तक्रार देऊन देवस्थान येथील आर्थिक गैरव्यवहाराबद्दल गुन्हा नोंद करण्याची विनंती केली होती. सदर तक्रारींवर पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे याचिकाकर्ते श्री. नामदेव गरड यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करून देवस्थान येथील गैरव्यवहार प्रकरण मा. उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून कार्यवाहीची मागणी केली होती.

प्रस्तुत प्रकारांची हकीकत अशी कि, श्री. जगदंबा देवी सार्वजनिक विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष मा. जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर असतात व त्या बरोबर ४ प्रशासकीय अधिकारी पदसिद्ध विश्वस्थ असतात. त्याचबरोबर इतर १० विश्वस्थांची नेमणूक मोहोटा गाव व मोहोटा गावाबाहेरील भक्तांमधून होते. श्री. गरड यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहिती प्रमाणे, देवस्थानच्या विश्वस्थांनी (त्यात एक जिल्हा न्यायाधीश व एक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांचा सहभाग होता) २ किलो सोने अंधश्रद्धेपोटी मंदिर परिसरात पुरले व सदर प्रकरणात होमहवन, पूजाअर्चा करण्यासाठी २५ लाख मजुरी पंडित ला देऊन आर्थिक गैरप्रकार केले.  श्री. गरड यांनी मा. जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार देऊन फिर्याद नोंदविण्याची विनंती केली. पुढे पोलीस प्रशासनाकडून देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने याचिकाकर्ते श्री. गरड यांनी ऍड. सतीश तळेकर यांच्या मार्फत सदर प्रकरणात CBI  चौकशी होऊन विश्वस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी रिट याचिका दाखल केली. 

सदर प्रकरणात उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, ट्रस्ट ने धर्मादाय आयुक्ताची परवानगी न घेता ट्रस्ट चा पैसा व सोने गैरकामासाठी वापरले. सदर सोन्यापासून सुवर्णयंत्र तयार करण्याची प्रक्रिया संशयास्पद असून त्याकामासाठी पंडित जाधवची नेमणूक कोणत्याची कायदेशीर मार्गानी झाली नव्हती. दोन किलो सोने व २५ लाख मजुरी देऊन अंधश्रद्धा ला फूस देण्याचे काम विश्वस्त मंडळाने केले. सार्वजनिक मालमत्ता जादूटोणा व अंधश्रद्धेपोटी वाया घालावली.  सदर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर २ न्यायाधीश असून देखील असे गैरकारभार झालेत. न्यायाधीश विश्वस्त असल्यामुळे सदर गैरकारभारावर कार्यवाही झाली नाही. सर्व तत्कालीन विश्वस्त विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असे नमूद केले आहे.  

सदर रिट याचिकेची उच्च न्यायालयचे न्या. टी व्ही नलावडे व न्या. एम.जी शेवलीकर यांनी गंभीर दाखल घेऊन पोलीस प्रशासनाला मोहोटा देवस्थाना मधील सुवर्णयंत्र गैरप्रकारणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात यावा. फसवणूक, कटकारस्तान, आर्थिक अफरातफरी, जादूटोणा प्रतिबंध कायदा व संगनमत या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपाधीक्षक यांनी सहा महिन्याच्या आत करण्याचे आदेश दिले आहे. 

सदर प्रकरणामध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने सतीश तळेकर,प्रज्ञा तळेकर,  अजिंक्य काळे वअविनाश खेडकर यांनी काम पहिले तर शासनाच्या वतीने एम एम, नेर्लीकर यांनी काम पहिले. ट्रस्टच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी काम पहिले.