औरंगाबाद कॅनॉटप्लेसमध्ये अतिक्रमणाची दखल

औरंगाबाद, ता. ३ : 

कॅनॉटप्लेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली असल्याचे फोटो न्यायालयाचे मित्र आनंद भंडारी यांनी औरंगाबाद खंडपीठ सांदर केले. सिडकोचे वकील अनील बजाजयांनी कॅनॉटप्लेससंबंधीचा आराखडा खंडपीठात सुनावणीदरम्यान सादर केला.दिल्ली आणि चंदीगडच्या धर्तीवर कॅनॉटप्लेस निर्माण करण्यात आल्याचे बजाज यांनी सांगून, ४.५ चौ. मि. क्षेत्रफळाच्या दुकानासमोर पादचाऱ्यांनाचालण्यासाठी जागा सोडली आहे. चालता-चालता खरेदी करता यावी म्हणून निर्माणकेलेल्या रस्त्यांवरच व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळेपादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालावे लागते. यामुळे वाहनतळाची गैरसोय होऊनचालताना अडचण होते. याचिकेची सुनावणी १८ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.राज्यशासनाच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी काम पाहिले. न्या टी वी नलावदे व न्या एम जी शेवलिकर यानी १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.