देवगिरी प्रांतातील १४ जिल्ह्यात भव्य संत संमेलनाचे आयोजन

श्री.रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र धनसंग्रह व जनसंग्रह अभियान
Foundation Of Ram Mandir Will Be Prepared From Stones Of Mirzapur Pictures  Of Temple Construction Site Ordered From Isro -

औरंगाबाद ,१जानेवारी :​अयोध्येतील प्रभूश्रीमाचे भव्य मंदिर हे देशातील सामान्य जनतेच्या सहभागातून उभारले जाणार असून यासाठी देवगिरी प्रांतातील ३० हजार कार्यकर्ते  १२५०० गावामध्ये १ कोटी २० लाख लोकांशी संपर्क करुन रु.१० रु.१०० आणि रु.१००० कुपन्स वितरीत करुन निधी जमा करणार आहेत.यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती तर्फे संपूर्ण देवगिरी प्रांतात   मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.         

वस्ती​ ​मेळाव्यांसोबतच दि.३ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत जिल्हानिहाय धर्माचार्य संमेलने  होणार असून यातील ​औरंगाबाद ​ शहर ग्रामीणचे एकत्रित संमेलन बुधवार .६ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता वाळुज येथीलजागृत हनुमान मंदिरात  होणार असून या धर्माचार्य संमेलनात देवगड संस्थानचे पू.ह.भ.प.भास्करगिरी महाराज उपस्थित रहाणार आहेत. याचप्रमाणे जानेवारी महिन्यात दि.३ परभणी दि.५ नांदेड दि.९ जालना जळगाव भुसावळ आणि किनवट दि.१० हिंगोली ​उस्मानाबाद ​ अंबाजोगाई आणि ​बीड ​ दि.११ धुळे व नंदूरबार आणि दि.१२ ला अक्कलकुवा येथे  असे एकून १५ धर्मसंमेलने  होणार असल्याची माहीती श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीचे देवगिरी प्रांत अभियान प्रमुख संजयआप्पा बारगजे यांनी ​दि​ली.