एलपीजी ग्राहकांसाठी मिस्ड कॉल सुविधेचा प्रारंभ

जीवन सुकर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज भुवनेश्वर येथे एका कार्यक्रमात एलपीजी ग्राहकांसाठी मिस्ड कॉल सुविधा सुरू केली. जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना संपूर्ण भारतभरात रिफिल बुकिंगसाठी आणि भुवनेश्वर शहरात नव्या कनेक्शनसाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉलच्या सुविधेचा वापर करता येईल.

आयव्हीआरएस सुविधेच्या तुलनेत मिस्ड कॉलचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेतः

  • जलद नोंदणी, ग्राहकांना फोनवर जास्त काळ प्रतीक्षा करावी लागत नाही.
  • आयव्हीआरएस कॉल सुविधेमध्ये लागू असलेल्या सामान्य कॉल चार्जेसच्या तुलनेत ग्राहकांना कोणतेही कॉल शुल्क लागू होत नाही.
  • ज्या ग्राहकांना आयव्हीआरएस सुविधेची माहिती नसते किंवा ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा वापर करताना अडचणी येतात त्यांना मिस्ड कॉलद्वारे रिफिलची नोंदणी सहज करता येते.
  • ग्रामीण भागातील ग्राहकांचे जीवन सुकर होईल.