इंटरप्रेस क्रिकेट स्पर्धेत एमसीएन, फोटोग्राफर, लोकमत, एएम विजयी

औरंगाबाद, दिनांक 1 :जिल्हा मराठी पत्रकार संघ व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या इंटरप्रेस क्रिकेट स्पर्धेत एमसीएन, फोटोग्राफर रॉयल्स, एएम न्यूज व लोकमत संघाने विजयी सलामी दिली.

जिल्हा क्रीडा संघटनेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रमोद माने, धनंजय लांबे, चक्रधर दळवी, दयानंद माने, अमिताभ श्रीवास्तव, मनोज बोरा, संघटनेचे अध्यक्ष विनोद काकडे, सचिव विकास राऊत, गिरीधर पांडे, देव शेजूळ, किशोर निकम, दुर्गेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात एमसीएनने दिव्य मराठीवर १६ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात फोटोग्राफर संघाने मराठवाडा इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाला २९ धावांनी पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात लोकमतने सकाळवर ९ गडी राखून मात केली. चौथ्या सामन्यात एएमने महाराष्ट्र टाइम्स संघाला ३६ धावांनी हरवले. संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारे सारंग चौधरी, संतोष सूर्यवंशी, विजय आहेर आणि फरहान सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेत पंच म्हणून बाबा चव्हाण, विलास राजपूत, विवेक घुगे यांनी काम पाहिले.