भारतात 13 दिवस सलग दिवसभरातील रुग्णसंख्या 30 हजारपेक्षा कमी

दिवसभरातील बरे झालेल्यांची संख्या नव्याने बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2020:रोगमुक्तांच्या संख्येत होत असलेली वाढ त्याचसोबत दररोजच्या नवीन बाधितांची घटणारी संख्या यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्येत सासत्याने घट दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदरही खाली आला आहे. बरे झालेल्यांची संख्या आज 97.5 लाख (97,40,108) नोंदवली गेली तर भारतील एकूण रोगमुक्तांची संख्या जगात सर्वाधिक आहे.

रोगमुक्तांच्या वाढत्या संख्येमुळे आज रुग्ण बरे होण्याचा दर  95.78% राहिला.भारताची सध्याची उपचाराधीन रुग्णसंख्या 2,81,667 इतकी असून ही एकूण बाधित रुग्ण संख्येच्या 2.77% आहे.गेल्या 13 दिवसांत सलग दिवसभरातील नवीन रुग्णसंख्या 30,000 पेक्षा कमी राहिली, गेल्या 24 तासात 22,273  नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली.

29 दिवस सातत्याने नोंदवला गेलेला हा कल कायम राखत भारतात गेल्या 24 तासातही दिवसभरातील बाधितांच्या संख्येहून दिवसभरातील रोगमुक्तांची संख्या जास्त नोंदली गेली. गेल्या 24 तासांत 22,274 जण कोविडमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 73.56% संख्या 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहे.कोविडमधून बरे झालेल्यांची नवी संख्या केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे  4,506 आहे, तर त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 1,954 जण तक महाराष्ट्रात 1,427  बरे झाले.

नव्याने बाधित झालेल्यांपैकी 79.16% रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.गेल्या दिवसभरात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 5,397 जणांची  बाधित म्हणून नोंद झाली, त्यानंतर महाराष्ट्रातील नवी रुग्णसंख्या काल 3,431 होती तर पश्चिम बंगालमध्ये 1,541  नव्या बाधितांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 251 जण मृत्यू नोंदवला गेले.कोविड मृत्यूंच्या संख्येपैकी 85.26% दहा राज्ये वा केंद्रशासित प्रदेशातील आहेत.  महाराष्ट्र सर्वाधिक म्हणजे 71 मृत्यू  झाले तर पश्चिम बंगाल व दिल्लात अनुक्रमे 31 व 30 मृत्यू झाले.