परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूचे व्दिशतक , 85 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 23 :- जिल्ह्यातील 85 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4788 एवढी झाली आहे. त्यापैकी 3870 बरे झाले तर 201 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 717 जणांवर उपचार सुरु आहेत. मंगळवार दि.22 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 76 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1698 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 717 असून रिक्त बेडची संख्या 981 आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *