आज देशव्यापी बंदचे आवाहन

Bharat Bandh Tomorrow: Transport Services, Essential Supplies Likely to Be  Affected in Delhi; Read Here

औरंगाबाद, दिनांक 7 :शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा देत आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी सूमारे २५० शेतकरी संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या केंद्रीय किसान समन्वय समितीने देशव्यापी बंद पुकारला आहे.

शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ३ पर्यंत भारत बंदची घोषणा केलीय. यावेळी सर्व दुकानं आणि व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये सर्व मार्केट बंद राहणार आहेत. लग्नाच्या कार्यक्रमांना यातून सूट देण्यात आलीय. रुग्णवाहीका आणि आपत्कालीन सेवा देखील भारत बंदतून वगळण्यात आल्यात.हे आंदोलन शांतीपूर्ण होईल. यामध्ये कोणत्याही हिंसक कृत्यास परवानगी नाही. जर कोणी असे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई होईल असे शेतकरी नेते बलदेव सिंह यांनी सांगितले. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गुजरातहून २५० शेतकरी दिल्ली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

भारत बंदला कांग्रेस, टीआरएस, द्रमुक, शिवसेना, समाजवादी पार्टी, एनसीपी, टीएमसी, आरजेडी, आप आणि डाव्या संघटनांनी पाठींबा दर्शवलाय. तसेच दहा केंद्रीय ट्रेड युनियन्सनी देखील समर्थन दिलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या शेतकरी संघाने भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर शेतकरी आपल्या आंदोलनाची गती आणखी तीव्र करतील असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते पूर्णपणे बंद करु आणि दिल्लीतील रस्ते पूर्णपणे बंद करु असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

नव्या कृषि कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिलीय. या घोषणेच्या सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कायदा आणि सुव्यस्था कायम राहावी यासाठी केंद्र सरकराने राज्य सरकारांसाठी निर्देश जाहीर केले आहेत. कोरोना नियमांचे पालन व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलंय. 

भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही,नवीन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होइल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. शेतकर्‍यांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन त्यांनी केले.