रोजगारासाठी कौशल्याधारित शिक्षण घ्यावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

May be an image of 3 people, people standing and indoor

औरंगाबाद,१५ जुलै /प्रतिनिधी :- नव उद्योगासाठी आवश्यक असणारे कौशल्याधारित शिक्षण घेऊन रोजगार निर्मिती करावी, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जागातिक युवा कौशल्य दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयात आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात युवकांना सांगितले.

May be an image of one or more people, people sitting, people standing and indoor

             या कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार उद्योजगता विभागाचे उपायुक्त सुनील सैदांणे, सहायक आयुक्त सुरेश वराडे, विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रायार्च डी. आर शेंगुळे यांची उपस्थिती होती. तसेच रोजगार मेळाव्यातून उमेदवाराची निवड करण्यासाठी मराठवाडा ऑटो कॉम्पो प्रा.लि. कास्मो फिल्म लिमिटेड, मायलन लॉबोरेटरीज, पॅरासन मशिनरी इंडिया, मॅन एज सोल्यूशन, फोर्ब्स ॲण्ड कंपनी प्रा. लि. कॅन पॅक इंडिया, पगारिया ऑटो लिमिटेड, नवभारत फर्टीलायझर्स प्रा.लि. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

May be an image of 4 people, people standing and indoor

             केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तरुणांना कर्ज, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे, या मध्ये स्टार्ट अप इंडिया, स्कील इंडिया, मुद्रा योजना यासारख्या उपक्रमात युवकांनी सहभाग घेवून रोजगार निर्मिती करावी, सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढल्या असून आरोग्य आदर-आतिथ्य, पर्यटन, ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग निर्मिती करण्याचा प्रयत्न युवकांनी करावा. औरंगाबाद जिल्ह्यातील कौशल्य  विकास आराखड्यात वस्त्रोद्योग, फळ प्रक्रिया उद्योग विविध ॲटोमोबाईल उत्पादन कंपन्या, पर्यटन स्थळ असल्याने अशा क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देणारे प्रशिक्षण जिल्हा प्रशासन मार्फत राबवित आहे. याचा लाभ युवकांनी घेवून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रोजगार मेळाव्यातील तरुणांना मार्गदर्शन करताना  सांगितले.