होम क्वांरटाईन असता घराबाहेर जाणे पडले महागात

Image may contain: text

खासगी हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

जालना, दि. 2 – सध्या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपुर्ण जालना जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा तसेच सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्याचे व सामाजिक अंतर पाळण्याबरोबरच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. परंतु जालना येथील एका खासगी हॉस्पीटलमधील कर्मचारी दि. 21 मे रोजी पॉझिटीव्ह आले होते. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या निकटसहवासित असलेला याच हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या स्वॅबचा नमुना 27 मे रोजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता व अशा परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्याने कोणाच्याही संपर्कात येऊ नये व होमक्वारंटाईन राहणे अपेक्षित होते. असे असतानासुद्धा सदरील कर्मचारी हा दि. 29 मे, 2020 रोजी क्रांतीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या लग्नात हेतुपुरस्पर उपस्थित राहिला. त्याच दिवशी या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह प्राप्त झाला. त्यामुळे कलम 144 (१)(३) च्या आदेशाचे उल्लंघन करुन कोरोनाविषाणुचा फैलाव करण्याचे कृत्य केले असल्याने या व्यक्तीवर कलम 188, 269,270 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) प्रमाणे पोलीस निरीक्षक एस.एस. देशमुख यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *