हरित फटाक्यास परवानगी,जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी 

The 'poisonous' pollutants of green crackers

औरंगाबाद,दि.१३-   जिल्ह्यातील कोविड-19 प्रतिबंध व आगामी दिवाळी व उत्सवातील व्यवस्थापन दृष्‍टीकोनातून करावयाच्‍या उपाययोजना यादृष्टीने  सुनील चव्हाण  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण,औरंगाबाद  यांनी सद्यस्थितीचा विचार करता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT)च्या निकष व नियमानुसार हरित फटाके (Green-Crackers) फोडण्यास परवानगी  आदेश जारी केले आहे.सदर आदेश दि.12 नोव्हेंबर 2020 चे रात्री 12.00 वाजले पासून ते पुढील आदेशा पर्यंत लागू राहतील . त्यानुसार जिल्ह्यात फक्त हरित फटाक्यांना (GreenCrackers)  रात्रौ 8.00 ते रात्रौ 10.00 वाजेपर्यंत या मर्यादित कालावधी दरम्‍यान फोडता येतील.    सदरील आदेश औरंगाबाद शहर व औरंगाबाद जिल्हा कार्यक्षेत्रात लागू आहेत.        

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 25 अन्वये जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यानुषंगाने कोवीड १९ प्रतिबंधक विविध उपाययोजना म्‍हणून राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण (NGT) च्या  दि. 09 नोव्हेंबर 2020 आदेशान्‍वये पोलीस आयुक्त शहर औरंगाबाद व जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांची  बैठक झाली, त्यामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील  हवेची गुणवत्ता व कोवीड नियंत्रण याबाबत चर्चा झाली.       

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ,औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयचे तज्ञ व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे अभिप्राय नुसार मागील वर्षीचा ऑक्टोबर व नोव्हेंबर 2019) औरंगाबाद जिल्ह्याचा हवेचा गुणवत्ता तपासले असता निदेशांक(AIQ)पर्यावरण निदेशांक  69 ते 77 व यावर्षाचा (एप्रिल ते माहे नोव्हेंबर 2020)पर्यावरण हवेचा गुणवत्ता निदेशांक 25 ते 70 पर्यंतचा आहे.जो की समाधानकारक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या गुणवत्ता निकषाच्या(AQI) आधारे नमूद केल आहे. राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण (NGT)च्या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यावरण निदेशांक(AQI)आज रोजी 77 असून हा समाधानकारक असल्याचे औरंगाबाद प्रादेशिक नियंत्रण महामंडळाने कळविले आहे.        

प्रसंगतः असे नमूद करण्यात येते की  NGT च्या निर्देशानुसार या आदेशात मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व संबंधितास बंधनकारक राहिल.’Mask is the Best Vaccine’ या कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनेचे पालन करून सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.जिल्ह्यात साथरोग प्रतीबंधात्मक कायदा 1897 आदेश लागू असल्याने दिवाळी व तत्‍सम आगामी उत्सव    साजरा करीत असताना कोविड 19 संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व सूचना जसे मास्कचा वापर, सामाजिक अंतर (दो-गज),सॅनिटाझरचा वापर इत्यादी नियमांचे पालन करणे संबंधितावर बंधनकारक राहिल.तसेच याद्वारे सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी आपले सामाजिक कर्तव्य समजून आसपासच्या वृद्ध,बालके,रुग्ण व गरोदर माता-भगिनी यांच्या स्वास्थ्याची काळजी करून शासनाच्या निर्देशांचे दक्षता पूर्वक पालन करून प्रदूषणमुक्त व कोविड-19 प्रतिबंधक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्यात यावे.   वरील  बाब आपत्ती व्यवस्थापन प्राधान्य/अति महत्वाची या अनुषंगाने हाताळण्यात यावी व त्यानुरूप प्राधान्याने तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.सर्व संबधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी.सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे आदेशात नमूद आहे.