पॅराग्लाईडींग, पॅरामोटर, हॉटएअर बलून, पॅरासेलिंग या साहसी खेळाचे औरंगाबाद मध्ये प्रथमच आयोजन

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-  मराठवाडा पर्यटन विकास संघटनेच्या  जी २० च्या पार्श्वभूमीवर आणि राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त औरंगाबाद येथे विविध साहसी पर्यटन क्रीडाप्रकार आयोजित केले आहे, यामध्ये पॅराग्लाईडींग, पॅरामोटर, हॉटएअर बलून, पॅरासेलिंग यांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात हे साहसी क्रीडा प्रकार चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. राजस्थान, दुबई, हिमाचल या ठिकाणी या साहसी क्रीडा प्रकारचा आनंद पर्यटक आवर्जून घेत असतात, मराठवाड्याच्या नागरिकांना आता याचा आनंद औरंगाबाद येथे घेता येणार आहे. २५ जानेवारी २०२३ बुधवार पासून सुरु होणारा हा साहसी क्रीडा महोत्सव ३० जानेवारी २०२३ सोमवार पर्यंत असणार आहे.

मराठवाडा पर्यटन विकास  संघटना 

मराठवाड्याच्या पर्यटन क्षेत्राला भरारी देण्यासाठी पॅराग्लाईडींग, पॅरामोटर, हॉटएअर बलून, पॅरासेलिंग या साहसी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. साहसी खेळासंदर्भातील सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून सुरक्षित असे चारही साहसी खेळ औरंगाबादकरांना उपलब्ध करून दिले आहेत. मराठवाडा पर्यटन विकास संगठनेकडे सर्वोत्तम अनुभवी टीम, जागतिक दर्जाचे अनुभवी आणि प्रशिक्षित मार्गदर्शक सोबत असल्यामुळे अगदी निश्चित होऊन तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

पॅराग्लाईडींग: पॅराग्लायडिंग हा हवेतील उड्डाण विषयक साहसी क्रीडा प्रकार आहे. यात विशिष्ट प्रकारच्या कापड व दोरीच्या सहाय्याने पंख ‍‍तयार करतात व ते हार्नेसला जोडून चालक त्यात बसतो. हवेच्या झोतावर स्वार होऊन हे उंच भरारी घेते.

पॅरामोटरिंग: साहसी खेळप्रकारातील पॅराग्लायडिंगची पुढची पायरी म्हणजे पॅरामोटरिंग. या प्रकारात एक पायलट पॅराशटूसह इंजिनच्या मदतीने हवेत झेपावतो. हे इंजिन विशेष प्रकारचे असते. साधारण ते २१० सीसीचे असते. ८ लिटर पेट्रोलची याची क्षमता असते. वर पॅराशूट आणि पाठीमागे प्रॉपलर असते. ८ लिटर इंधनात एक व्यक्ती हवेच्या मदतीने साधारणपणे ९० ते १०० कि. मी. चा प्रवास करू शकते. पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंगमध्ये केवळ मोटरचाच फरक असतो.

हॉटएअर बलून : गरम हवेचा फुगा हे विमानापेक्षा हलके विमान असते ज्यामध्ये पिशवी असते, ज्याला लिफाफा म्हणतात, ज्यामध्ये गरम हवा असते. खाली निलंबित गोंडोला किंवा विकर बास्केट असते,जे प्रवासी आणि उष्णतेचे स्त्रोत घेऊन जातात, बहुतेक प्रकरणांमध्ये द्रव प्रोपेन जळल्यामुळे उघडलेली ज्वाला असते. आधुनिक खेळाच्या फुग्यांमध्ये लिफाफा सामान्यत: नायलॉन फॅब्रिकपासून बनविला जातो आणि फुग्याचा प्रवेश (बर्नरच्या ज्वालाच्या सर्वात जवळ) नोमेक्स सारख्या अग्निरोधक सामग्रीपासून बनविला जातो.

पॅरासेलिंग: जमिनीवर आधारित पॅरासेलिंगमध्ये, पॅरासेलला 4 व्हील ड्राईव्ह वाहनाच्या मागे जास्तीत जास्त उंचीवर नेले जाते आणि नंतर टो लाइन सोडते आणि अचूकतेच्या स्पर्धेत लक्ष्य क्षेत्रापर्यंत उडते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) च्या सहकार्याने आयोजित केलेल्या या साहसी क्रीडा प्रकारांच्या अधिक माहितीसाठी सम्पर्क ९१६८६५७००१ / ७०६६२८११११ या क्रमांकावर संपर्क साधा. https://www.marathwadatourism.com/