नांदेड जिल्ह्यात 49 कोरोना बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

112 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 31 :- शनिवार 31 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 112 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 49 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 31 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 18 बाधित आले.

आजच्या एकुण 701 अहवालापैकी 644 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 119 एवढी झाली असून यातील 17 हजार 934 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 525 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालानुसार सहा बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी कंधार तालुक्यातील शिराढोण येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, तर दत्तनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा, हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी येथील 31 वर्षाच्या एका पुरुषाचा, सांगवी नांदेड येथील 39 वर्षाच्या एका पुरुषाचा, प्रफुलनगर भोकर येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा, तर शनिवार 31 ऑक्टोंबर 2020 रोजी शिवरायनगर तरोडा बु नांदेड येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 513 एवढीच आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 13 हजार 990निगेटिव्ह स्वॅब- 90 हजार 507एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 119एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 934एकूण मृत्यू संख्या- 513उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.15 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 363रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 525आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 36.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.