भाई धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षानिमित्त कोविड रुग्ण व नातेवाईकासाठी भाऊचा डब्बा

प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांचा पुढाकार

लोहा ,५मे /  हरिहर धुतमल  

कंधार तालुक्यात कोरोनाचा फैलाव सुरू आहे असा काळात लोहा शहरात खाजगी व सरकारी कोविड रुग्णालयातील  रुग्ण व नातेवाईक यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी  श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांनी पुढाकार घेतला आहे.राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ व मराठवाड्याचे भूमिपुत्र भाई केशवराव धोंडगे यांच्या  शतकोत्सव वर्षानिमिताने भाऊंचा डब्बा या सामाजिक उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र दिना पासून करण्यात आली आहे.
शनिवार पासून (ता.एक) कंधार- लोहा येथील कोरोना केअर सेंटरमधील  रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी “भाऊच डब्बा”  हा उपक्रम सुरू करण्यात आला. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. पुरूषोत्तम धोंडगे यांच्या पुढाकाराने  शनिवारी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.         

राज्यातील ज्येष्ठ नेते व मराठवाड्याचे भूमिपुत्र  माजी खासदार व माजी आमदार  भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी वयाची शंभरी पार केली आहे.शतकवीर  भाई  धोंडगे यांचा शतकोत्तर वर्ष साजरे केले जात आहे. सद्या कोरोना चा उद्रेक पाहता  मदतीसाठी  धोंडगे कुटुंब धावून आले आहे. सामाजिक बंधिलकी जोपासत सोसायटीचे अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांनी दोन्ही  तालुक्याच्या मुख्यालयी असलेल्या खाजगी व शासकीय कोविड रुग्णालय व सेंटर मधील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे .

“भाऊंचा डब्बा” या उपक्रम अंतर्गत दररोज रुग्ण व नातेवाईक याना जेवण दिले जात आहे . महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या  “भाऊंचा डब्बा” लोह्यात सुरू करण्यात आला आहे. प्रा. डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांच्य उपस्थिती  संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील पेठकर यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला .यावेळी  मराठा सेवसंघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील  जाधव, छावा जिल्हाध्यक्ष  माऊली पाटील पवार, संस्थेचे सदस्य गुरूनाथ पाटील पेठकर, डॉ. पवार,  डॉ. धनसडे, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. केंद्रे, डॉ. पदमवार, डॉ.पोकले, सुधाकर पाटील पवार, प्रा. प्रदीप गरूडकर,  वाघमारे, प्रसाद, आकाश कदम आदी उपस्थित होते.