छत्रपती संभाजीनगरात आज अमित शाह यांची सभा 

वाहतुकीत मोठे बदल

छत्रपती संभाजीनगर,४ मार्च / प्रतिनिधी :-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाच मार्चला शहरात येणार असून, व्हीव्हीआयपी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात चार मार्च ते ५ मार्च या काळात छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘नो ड्रोन झोन’ घोषित करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. ‘नो ड्रोन झोन’साठीचा प्रतिबंधक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी लेखी आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम १८८ आणि व प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यईल. हा आदेश चार मार्चपासून पाच मार्चपर्यंत अमलात राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पाच मार्चला सांस्कृतिक क्रीडा मंडळ, खडकेश्वर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाच मार्चला दुपारी दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिली.