विकसित भारत संकल्प यात्रेचा केंद्रीय सचिवांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामिण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  जिल्ह्यात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा केंद्रीय  महिला बालकल्याण विभागाचे सचिव राय महिपत रे यांनी आज आयोजित बैठकीत घेतला.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात विकसित भारत संकल्य यात्रा ८५६ गावांत नियोजित होती. त्यापैकी ७७८ गावांमध्ये यात्रा नेण्यात आली. उर्वरित ७८ ग्रामपंचायतींमध्ये येत्या आठवड्यात यात्रा नेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी सादर करण्यात  आली. शिल्लक ग्रामपंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा नेऊन त्या त्या गावांमधील लाभार्थ्यांना योजनांची माहिती, वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया राबवावी,असे निर्देश श्री. रे यांनी दिले.