ऐतिहासिक १०० व्या मन की बातचे छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये ३५१ ठिकाणी कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर ,३०  एप्रिल / प्रतिनिधी :-भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष  शिरीष बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमधील तीन विधानसभा व दहा मंडळामध्ये ३५१ मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी सर्व सामान्य जनतेकडून या कार्यक्रमाला भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला , प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी शंभर ते दीडशे पेक्षा अधिक संख्येने नागरिक उपस्थित होते,शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३५१ ठिकाणी कार्यक्रमाचे ,शक्ती केंद्रप्रमुख ,बूथ प्रमुख , मंडलाध्यक्ष यांच्या मार्फत नियोजन करण्यात आले होते.

भाजपचे प्रमुख पदाधिकारी केंद्र अर्थमंत्री राज्य मंत्री डॉ.भागवत कराड , कॅबिनेट मंत्री  आमदार अतुल सावे , भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर , ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे आदी मान्यवर विविध ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते तसेच मंडळ अध्यक्ष , जिल्हा पदाधिकारी व पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये सोसायटीमध्ये , नागरी वसाहतीमध्ये त्यांनी या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले.

या कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्य नागरिक व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १००  व्या मन की बात कार्यक्रम ऐकण्याचा आस्वाद घेतला , त्याच बरोबर शहराध्यक्षांचा आव्हानाला प्रतिसाद देऊन शहरांमधील अनेक लोकांनी स्वयंप्रेरणेने त्यांच्या घरी व आपल्या सोसायटीच्या मैदानामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.असे असंख्य कार्यक्रम झालेत त्या मुळे खऱ्या अर्थाने मन की बात हा कार्यक्रम शहर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला अशी  माहिती शहर  जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.

त्याच बरोबर शहरातील प्रतिष्ठित नागरिक , डॉक्टर ,वकील , प्राध्यापक , व्यापारी यांच्यासाठी आय एम ए हॉल या ठिकाणी विशेष स्क्रीनिंग अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर मंडळींनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला अशी माहिती भाजपचे  शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.

आपकी बार चारसो पार ,फिर एक बार मोदी सरकार

रमानगर,सिंधी कॉलनी ,स्टेट बँक कॉलनी ,चेतना नगर ,कुशल नगर , रामानंद नगर ,महुनगर या प्रभागामधील चे वार्ड अध्यक्ष अनिल गवळे यांच्या घरी शंभर व्या मन की बात चे आयोजन केले , मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशांमधील जनतेसोबत मागील सात ते आठ वर्षांपासून अविरतपणे महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनते सोबत संवाद साधत असतात , आज 30 एप्रिल 2023 रोजी  ऐतिहासिक  100 व्या भाग होता , त्यांनी देशातील जनतेसोबत संवाद साधला , या कार्यक्रमाचे आयोजन रमानगर परिसर मध्ये करण्यात आले होते ,या वेळी  लहान मुले , वार्डमधील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ,त्या मध्ये डॉ.राम बुधवंत ,कचरू खिल्लारे ,पंकज पवार ,अनिकेत गवळे ,अभिजीत मगरे ,आयर्न मगरे , सोनू जगताप , शिंचू कांबळे ,आदी कार्यकर्ते या वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 100 व्या मन की बात चे मनोगत ऐकण्या साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,