हमी भावाने कापूस खरेदी केंद्र सुरु

छत्रपती संभाजीनगर,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जिल्ह्यात वैजापूर, पाचोड, गंगापूर व लासूर अशा एकूण ४ कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफ.ए.क्यू. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु आहे. तसेच याव्यतिरिक्त सीसीआय मार्फत  जिल्ह्यात सिल्लोड व बालानगर या २ केंद्रावर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा,असे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.