परभणी जिल्ह्यात 157 रुग्णांवर उपचार सुरू, 18 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 2 :- जिल्ह्यातील 19 रुग्णांचे अहवाल मंगळवार दि.1 डिसेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7143 एवढी झाली आहे. त्यापैकी 6697 बरे झाले तर 289 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 157 जणांवर उपचार सुरु असून मंगळवार दि.1 डिसेंबर रोजी एकुण 9 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 739 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 157 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 582 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.