‘हैदराबाद मुक्तिसंग्रामा’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात

छत्रपती संभाजीनगर,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्यावतीने ‘ हैदराबाद  मुक्ती संग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात झाला.

कार्यक्रमास  उपायुक्त अपर्णा थेटे, मंगेश देवरे, सविता सोनवणे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी   शंभूराजे विश्वासू, शहर अभियंता अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.

 हैदराबाद  मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सांगतासं संपूर्ण   मराठवाड्यात  भरगच्च कार्यक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात अभिजीत आणि सरला शिंदे यांनी आलाप ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यामध्ये वंदे मातरम..वंदे मातरम …, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा…, मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती…, संत महंताची भूमी माझी मराठवाड्याची, भोळीभाबडी माणसं लय पुण्यवान माती…जय जय महाराष्ट्र माझा…या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.