राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

मुंबई, दि. 5 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.

दिनांक 5 मार्च रोजी राज्यपालांनी याच शासकीय रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला होता.

करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ.रणजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.