वैजापूर येथे जैन समाजातर्फे आचार्य श्री.विद्यासागरजी महाराज यांना भावपूर्ण आदरांजली

वैजापूर,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-संत शिरोमणी परमपूज्य आचार्य श्री.विद्यासागरजी महाराज व परमपूज्य आचार्य श्री.दौलतसुरिश्वरजी महाराज यांना सकल जैन समाज वैजापूरतर्फे रविवारी (ता.25) भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

शहरातील जैन स्थानक वैजापूर येथे सकल जैन समाज, वैजापूर तर्फे श्रध्दांजली सभेचे आयोजन नवकार साधक परमपूज्य श्री.तारकऋषीजी महाराज  व आगमज्ञाता परमपूज्य श्री.सुयोगऋषीजी महाराज यांच्या सान्निध्यात करण्यात आले होते. याप्रसंगी  आमदार प्रा.रमेश बोरणारे, मा.नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी आमदार आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, उद्योगपती शांतिलाल पहाडे, श्रेयस कासलीवाल, धन्नुभाऊ ठोळे, डॉ.संतोष गंगवाल, संतोष पाटणी, हार्दिक लोहाडे, आनंदीताई अन्नदाते, सरोज गंगवाल, मीना पाटणी, रोशनी पाटणी, आशा पाटणी, सीमा संघवी, रविंद्र संचेती यांनी दोन्ही गुरूदेवांप्रती आपले श्रध्दासुमन अर्पित केले… कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जैन जागृती पाठशाळेचे राजेंद्र संचेती यांनी केले. यावेळी प्रकाशचंद बोथरा, मेजर सुभाषचंद संचेती, रतिलाल संचेती, प्रफुलकुमार संचेती, निलेशकुमार पारख, विनोद छाजेड, रिखबचंद संचेती, सुभाषचंद संचेती, राजेंद्र पारख, सजनराज तोडरवाल, पराग छाजेड, आनंद गंगवाल, संतोष कासलीवाल, अनिल गंगवाल, महावीर ठोले, डॉ. धरमचंद संचेती, दिलीप लोहाडे, संतोष ठोले, प्रवीण संचेती, राजमलजी पाटणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी लवकरच परमपूज्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या स्मरणार्थ एक कोटी रुपयांच्या निधीतून त्यागी भवन बांधून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.