छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य

छत्रपती संभाजीनगर,२९ जानेवारी / प्रतिनिधी :-महाराष्ट्र  राज्यातील विद्यार्थ्यांच्या मूर्त कलागुणांना स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते.त्यात छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयतील दोन विजेत्यांना प्रत्येकी एक लाख व बीज भांडवल प्रमाणपत्र  जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे पाटील व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४  प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले.

राज्यातील  विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुण विकसित करून नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे.  हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. या उपक्रमाचे अनावरण १५ जुलै २०२३ रोजी मंत्री, कौशल्य, रोजगार, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले होते. या अंतर्गत जिल्हास्तरिय सादरीकरणाचा टप्पा  CSMSS छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १५ डिसेम्बर २०२३ रोजी घेण्यात आला होता. यात एकूण  शासकीय व खासगी असलेल्या शैक्षणिक संस्था तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अशा एकूण २,१७२ संस्थानी सहभाग घेतला होता.

या विद्यार्थ्यांना अगदी कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचे स्वयंचलित पालेभाजी लागवड यंत्र व स्वयंचलित बियाणे पेरणी यंत्र विकसित करून सामान्य शेतकऱ्यांसाठी हे उपकरण उपलब्ध करून दिले आहे. यात टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या वनस्पतींची लागवड स्वयंचलित भाजीपाला लागवड यंत्राद्वारे करता येते. ही यंत्रणा कमीत कमी मनुष्यबळ आणि कमी वेळेत अधिक भाजीपाल्याची रोपे लावू शकते. यंत्रामुळे दोन रोपांमधील अंतरही कमी होते, त्यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन मिळते. ट्रेमधुन रोप उचलुन हे आपोआप जमिनीत लावले जाते.

यंत्र विकसित करण्यासाठी महाविद्यालयाच्या टीममध्ये गणेश जंढे, राणी राठोड, (पॉवर ट्रान्समिशन) रोहन मुरदारे, अनिकेत गाडे, पवन कर्पे, श्रीनाथ पाटील, नितीन ताठे, अनिकेत साळुंके, अर्जुन मटने, ओंकार हुगेवार (​मॅन्युफॅक्चरिंग ), जान्हवी पाटील, मयुरी जामदार, रिया धूत, जान्हवी बैरागी, आरती मोहन (मार्केटिंग), निकिता राठोड, अल्ताफ शेख (ऍक्चुएटर अँड लॉजिक प्रोग्रामिंग सिस्टिम), प्रमोद भंडारे, स्नेहा शिंदे, अभिषेक शिंदे, केतन अरसुले, फॅकल्टी ऍड वाईझर प्रा. सचिन लहाने, प्रा युवराज नरवडे, सहाय्यक मार्गदर्शक मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. आर.एच. शिंदे, आयक्यूएसी हेड डॉ. आर. पी. चोपडे,  प्रा. संजय कुलकर्णी (ट्रैनिंग अँड प्लेसमेंट सेल), डॉ. मनोज मते, अंकिता ऍग्रो इंजिनीरिंग डायरेक्टर श्री. एस. एन. पाटील,  श्री. विष्णू खडप, श्री.  सुनिल जाधव, श्री. दीपक पवार, श्री. अनिल मालकर व शेती अभ्यासक श्री.जनार्धन कांबळे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  श्री. रणजित मुळे, सचिव  श्री. पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, कौशल्य रोजगार सहाय्यक आयुक्त  श्री. सुरेश वराडे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार, संस्थेचे एच. आर. ऑफिसर श्री. अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील यांनी अभिनंदन केले आहे.