परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी, दीपक रणनवरे यांचे अन्नत्याग उपोषण सुरू

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे तसेच  इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मुख्य समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते  दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून जालना शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

       ब्राह्मण समाजातील तरूणांना रोजगार मिळावा तसेच ते स्वतःच्या पायावर उभे राहिवेत, यासाठी महाराष्ट्र राज्यातील समस्त ब्राह्मण समाज परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करीत आहे. या मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाजाने मोर्चे काढून आंदोलनही केले आहे. आंदोलन करूनही राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा न केल्याने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून ( दि. २८) जालना शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून रणनवरे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक धनंजय कुलकर्णी, ॲड. राजेंद्र पोतदार, श्रीकांत जोशी, विश्वजित देशपांडे, मंदार कुलकर्णी, मकरंद सोनसांवगीकर, महेश अकोलकर, दिनकर सापनाईकर हांडेराव पाटील, रावसाहेब पाटोदकर,शाम कुलकर्णी, प्रवीण जोशी, रेणुकादास मुळे, अशोक वाघ आदींनी पाठिंबा देत ही मंडळीही उपोषणात सहभागी झाली आहे.

             उपोषणाला बसण्यासाठी सर्व महापुरुषांना अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज आनाभाऊ साठे स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून गांधीचे म्हणते दीपक उपोषणास बसले प्रारंभी दीपक रणनवरे यांनी उपोषणास सुरूवात केल्यानंतर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची भूमिका मांडली. यावेळी धनंजय कुलकर्णी, विश्वजित देशपांडे,ज्येष्ठ विधिज्ञ बळवंत नाईक, प्रा. एस. एम. देशपांडे, सिध्दीविनायक मुळे ,सौ. शुभांगी देशपांडे अँड सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली.

उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाचे पाठिंबा यामध्ये राजेश राऊत राजेंद्र गोरे आशोक उबाळे संजय देठे दिला तसेच माळी समाजाचा पाठिंबा आमरदीप शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रिभाऊ पठाडे हिंदू महासभा धनसिंग सुर्यवंशी यांनी पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी पाठिंबा दिला कोंग्रेसचे संजय लाखे पाटील शरद देशमुख मावली कदम

            यावेळी विनायक डोणगांवकर, सुनील मुळे, सदाशिव भट, लक्ष्मीकांत दाभाडकर,दिलीप देशपांडे, अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, संकेत मोहिदे, गौरव जहागीरदार,  दीपक देशमुख, देवानंद जोशी, शामसुंदर चितोडा,राम देशपांडे, रविंद्र देशपांडे, भगवान पुराणिक, सतीश अकोलकर, सुरेंद्र न्यायाधीश, विद्या कुलकर्णी, दीपाली बिन्नीवाले, शालिनी पुराणिक, सुजाता कुलकर्णी, रूचिता सेवलीकर, आशा भाले, रोहिणी टाकळकर, जान्हवी वैद्य, पोर्णिमा जवळकर, विशाखा नाईक, मनिषा लाड, रोहिणी देशपांडे, अरूणा फुलमामडीकर, उषा कुलकर्णी, नीलिमा कल्याणकर, वर्षां रामदासी अमृता तळणीकर, पोर्णिमा जोशी  आदींची उपस्थिती होती.